मुंबई : चांद्रायान -२ मोहिमेला यश आले नाही. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला आहे. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. शास्त्रज्ञांना खूप वाईट वाटले. मात्र, संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे अनेक संदेश सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत. तसाच एक संदेश उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पोस्ट करत पुन्हा प्रयत्न करा यश आपलेच आहे. तुमचा संपर्क तुटलेला नाही, असे सांगत शास्त्रज्ञांना पाठिंबा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करत वैज्ञनिकांचं मनोबळ वाढविले आहे. तर क्रिकेटपट्टू वीरेंद्र सेहवाग यांनेही 'हम होंगे कामयाब' असे म्हणत आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केल आहे. दरम्यान, विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरुच आहे, असे इस्त्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



चांद्रयान-२ चा अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने नाराज झालेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला ट्विटरवरुन दिला आहे. विक्रम लँडरचा चांद्रयानाशी संपर्क तुटलेला नाही. प्रत्येक भारतीय व्यक्ती चांद्रयान-२ च्या हृदयाची धडधड ऐकू शकतोय. ते आपल्याला एक संदेश देत आहे. तो संदेश म्हणजे, जर पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तर पुन्हा प्रयत्न करा, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.



भावूक झालेले इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी यासंदर्भात औपचारिक घोषणा करत विक्रम लँडरशी संपर्क तुटला असून डेटा गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती दिली. त्यानंतर नाराज शास्त्रज्ञांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला.